गोंदिया : नगरपालिकांचा रणसंग्राममध्ये पूर्व विदर्भातल्या गोंदिया नगर परिषदेचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे. गोंदिया हा राष्ट्रवादीचा गड समजला जात असला तरी सध्या इथं भाजपची सत्ता आहे. प्रफुल्ल पटेल आणि राजकुमार बडोलेंची प्रतिष्ठा याठिकाणी पणाला लागलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोंदिया. पूर्व विदर्भातली तब्बल 98 वर्षे जुनी नगर परिषद. गोंदिया हा माजी मंत्री प्रफुल्ल पटेलांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र सध्या याठिकाणी भाजपची सत्ता आहे. गोंदिया नगर परिषदेत 40 सदस्य असून त्यात भाजपचे 16, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 11, काँग्रेसचे 8, शिवसेनेचे 3 आणि अपक्षांचे 2 सदस्य आहेत. आगामी निवडणुकीत सदस्य संख्या 43 एवढी असेल. 


गोंदियामध्ये राष्ट्रवादीची सत्ता पुन्हा आणण्यासाठी प्रफुल्ल पटेलांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. तर ालकमंत्री राजकुमार बडोले भाजपची सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्नशील असतील.गेल्या पाच वर्षांत गोंदिया नगर परिषदेत आघाडीत समन्वय दिसला नाही. त्याचाच थेट फायदा भाजपला झाला आणि त्यांनी सत्ता काबीज केली.


सत्तापालट झाला तरी गोंदियाकरांच्या समस्या संपलेल्या नाहीत. शहराचा विकास केवळ नावापुरताच झालेला दिसतो. त्यामुळे मुलभूत सोयीसुविधा आणि रखडलेला विकास या मुद्यांवर ही निवडणूक लढवली जाईल असं दिसतं. त्यामुळे आता गोंदिया नगर परिषदेत भाजपा सत्ता टिकवते की, राष्ट्रवादी पुन्हा खेचून आणते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.