पुणे : पुणे मेट्रोच्या कामाला सुरुवात झालीय. वनाज ते रामवाडी या टप्प्यातील तीन किलोमीटर मार्गाचा सर्व्हे पूर्ण करण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महा मेट्रोचे कार्यकारी संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी ही माहिती दिली. पुण्यातील कोरेगाव पार्कच्या ओरियन कॉम्प्लेक्समध्ये पुणे मेट्रोचे अधिकृत कार्यालय सुरु करण्यात आलं आहे. इथूनच पुणे मेट्रोचं काम वेग घेणार आहे.


सर्व्हेचं काम पुढील 15 दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतर निविदा काढणार असल्याचा दीक्षित यांनी म्हटलंय.


दरम्यान, भूसंपादन आणि मेट्रोसाठी कर्ज उभारणीचं कामही सुरु आहे. पुणे मेट्रोचा सगळा खर्च ११,४२० कोटी रुपये असणार आहे. तर, पाच वर्षात हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.


पुणे मेट्रोनं सोशल मीडियावर मात्र घोउडदौड सुरु केलीय. पुणे मेट्रो रेल या नावाने फेसबुक आणि ट्विटरवर अकॉउंट उघडण्यात आलं आहे आणि त्याला नेटीझन्सचा मोठा प्रतिसाददेखील मिळत आहे.