नागपूर : देशाच्या डिजीटल व्यवहारांना चालना देण्यासाठी आता सरकारनं एक नवी योजना जाहीर केली आहे. भीम अॅपची माहिती जास्तीत जास्त लोकांना माहिती व्हावी यासाठी भीम अॅप शिकवा आणि १० रुपये कमवा अशी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केली आहे.


देशभरात १०० डिजीधन मेळावे घेण्यात आले. त्या निमित्तानं भीम अॅपचा वापर करणाऱ्यांपैकी काही भाग्यवान विजेत्यांना पुरस्कारही देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते महाराष्ट्रातल्या दोघांना हा पुरस्कार मिळाला. लातूरमध्ये किराणा मालाचं दुकान चालवणाऱ्या श्रद्धा मेगशेट्टी या युवतीला १ कोटी रुपयांचा इनाम मिळालं. तर ठाण्याच्या रागिणी उत्तेकर यांनाही 25 लाखांचं बक्षिस मिळालं.