मुंबई : नियुक्ती होऊनही पदभार न स्वीकरणा-या डॉक्टरांना राज्य सरकारने दणका दिलाय. सार्वजनिक आरोग्य विभागातील 581 डॉक्टरांना विभागाने फरार केलंय. नियुक्ती होऊनही 581 डॉक्टर्स 10 ते 15 वर्षापासून रुजू नव्हते, त्यामुळे त्यांच्यावर सामान्य प्रशासनातर्फे ही कारवाई करण्यात आली.


आत्तापर्यंत या डॉक्टर्सवर कारवाई झाली नव्हती. यापैकी 104 डॉक्टरांची सरकारी सेवा समाप्त झालीय. बाकीच्यांवर कारवाई सुरू आहे. 581 पदं नव्याने लवकरच भरली जाणार आहेत.