शासनाची फसवणूक प्रकरण, रत्नागिरी शहर पोलीस अडचणीत
भाजप खासदार अजय संचेती यांच्या नावाने बनावट पत्राचा वापर करुन फससवणूक प्रकरणात रत्नागिरी शहर पोलीस चांगलेच अडचणीत आलेत. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी संतोष नारायणकर याला अटक करण्यात आली आणि त्याच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक खुलासेदेखील समोर आलेत
रत्नागिरी : भाजप खासदार अजय संचेती यांच्या नावाने बनावट पत्राचा वापर करुन फससवणूक प्रकरणात रत्नागिरी शहर पोलीस चांगलेच अडचणीत आलेत. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी संतोष नारायणकर याला अटक करण्यात आली आणि त्याच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक खुलासेदेखील समोर आलेत
या प्रकरणात आरोपीला पकडण्यासाठी या अगोदर देखील एक पथक राजस्थानला गेलं होते. त्यावेळी या पथकातील पोलिसांनी आरोपीला पळून जाण्यास मदत देखील केली होती. पोलीस तपासात रत्नागिरी शहर पोलिस स्थानकातील दोन कर्मचाऱ्यांनी यासाठी मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
हवालदार श्रीनिवास नाटेकर आणि शिपाई शंकर शिंदे अशी दोघांची नावे आहेत. संतोष याला राजस्थान इथून पकडता पळून जाण्यासाठी केली मदत त्या बदल्यात या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी काही पैशांची मागणी नारायणकर याच्याकडे केली. फोनवरुन या संदर्भातील पैशांची मागणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी केली होती. आरोपीच्या फोन रेकाँर्डवर पोलिसांच्या नंबरमुळे या साऱ्या प्रकरणाचा उलगडा झाला.