आजीनेच केला तीन महिन्याच्या चिमुरडीचा खून
आजीनेच आपल्या तीन महिन्याच्या नातीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पुणे : आजीनेच आपल्या तीन महिन्याच्या नातीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
उंड्री येथील अतुलनगरमध्ये मंगळवारी 3 महिन्याच्या मुलीचा मृतदेह आढळून आला होता.
मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार केली होती. या चिमुरडीचं बारसंही झालं नव्हतं त्याआधीच तिची हत्या करण्यात आली होती.
पोलिसांनी तपास केला असता मुलीच्या आजीनेच हत्या केल्याचं स्पष्ट झालं. कोंढवा पोलिसांनी आरोपी आजीला अटक केली आहे.