नागपूर : इथेनॉलवर धावणा-या पहिल्या बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. नागपूरची वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीची मागणी बघता शहरात चांगली बस सेवा उपलब्ध करणे अतिशय आवश्यक होते. त्याच दृष्टीइन नागपुरात ग्रीन आणि रेड बसची सुरवात करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या टप्प्यात ५० बसचा लोकार्पण सोहळा नागपुरात पार पडला. नागपूरात सध्या डिझेलवर धावणा-या बस सुरु आहेत. मात्र नव्यानं सुरु केलेली बससेा ही इथेनॉलवर चालणार असल्यानं शहरातील वायुप्रदुषणात कमालीची घट होणार आहे.


शिवाय या बस सेवेसाठी खास ऍप तयार करण्यात आलंय ज्याच्या सहाय्यानं बस ठराविक स्थानकावर किती वेळात पोचेल हे देखील समजणार आहे. या बस सेवेकरिता लागणारी जमीन देखील येत्या काळात नागपुरात उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.