भावाला फाशीची शिक्षा द्या, उल्हासनगरमधल्या `त्या` बहिणीची मागणी
घराण्याची बदनामी झाली म्हणून आपल्या बहिण्याच्या पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये घडला आहे. सहा दिवसांपूर्वीच तिचं लग्न झालं होतं.
उल्हासनगर : घराण्याची बदनामी झाली म्हणून आपल्या बहिण्याच्या पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये घडला आहे. सहा दिवसांपूर्वीच तिचं लग्न झालं होतं.
पंकज गौहेर असं मृत तरुणाचं नाव आहे. पंकज आणि पूजानं गेल्याच आठवड्यात रजिस्टर पद्धतीनं लग्न केलं होतं.
आपल्या मुलीनं एखाद्या सरकारी नोकरीत असलेल्या व्यक्तीशी लग्न करावं, अशी इच्छा तिच्या घरच्यांची होती. पंकजशी लग्न करून पूजानं आपल्या घराण्याचं नाव धुळीला मिळवलं, असं त्यांना वाटत होतं.
याचीच परिणीती सोमवारी पाहायला मिळाली. याच रागातून पूजाचा भाऊ अरुण यानं आपल्या काही साथीदारांसहीत पंकजच्या घरात प्रवेश केला आणि त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्याच्या कुटुंबीयांनाही मारहाण करण्यात आली.
पूजाच्या हातावरची मेहंदी निघण्याच्या आधीच तिच्या नवऱ्याची हत्या या सख्या भावांनी केली. या भावाला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी आता पूजानं केलीय. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.