हसनेनची शेअर बाजारात कोट्यावधींची उलाढाल
घरातील १४ जणांची निघृण हत्या करुन स्वत:चे जीवन संपवणाऱ्या हसनेने वरेकर प्रकरणात पोलिसांना तपासादरम्यान तो शेअर बाजारात गुंतवणूक करत असल्याची माहिती समोर आलीये.
ठाणे : घरातील १४ जणांची निघृण हत्या करुन स्वत:चे जीवन संपवणाऱ्या हसनेने वरेकर प्रकरणात पोलिसांना तपासादरम्यान तो शेअर बाजारात गुंतवणूक करत असल्याची माहिती समोर आलीये.
डिसेंबरपर्यंत हसनेने चार कोटी रुपयांची उलाढाल केल्याची माहिती तपासादरम्यान पुढे आलीये. शेअर बाजारात पैसे गुंतवण्यावरुन त्याचे वडिलांशी वाद सुरु होते.
शेअर बाजारातील गुंतवणुकीमुळे हसनेनला मोठा आर्थिक फटका बसल्याने त्याला ६८ कोटींचे कर्ज झाले होते असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. शेअर बाजारातील त्याने केलेल्या व्यवहारांबाबत माहिती मिळवण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरु होते.
यावरुन त्याने आत्महत्या कऱण्यामागचे काही धागेदोरे पोलिसांना सापडू शकतील. या हत्याकांड प्रकरणात हसनेनची बहीण सुबिया एकमेव जिवंत आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.