आईच्या ऑपरेशनसाठी आणलेले १ लाख लोकलमध्ये विसरला...
आईच्या ऑपरेशनसाठी लागणारी १ लाख रुपयांची रक्कम ते लोकलमध्ये विसरले. कल्याण स्थानकावर उतल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने स्टेशन मास्तरला याबाबत सांगितलं आणि त्यांना आपले पैसे परत मिळाले.
कल्याण : आईच्या ऑपरेशनसाठी लागणारी १ लाख रुपयांची रक्कम ते लोकलमध्ये विसरले. कल्याण स्थानकावर उतल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने स्टेशन मास्तरला याबाबत सांगितलं आणि त्यांना आपले पैसे परत मिळाले.
ही घटना घडलीय नितेंद्र शंकलेशा यांच्यासोबत. नितेंद्र यांच्या आईला दुर्धर आजाराने ग्रासलंय. डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशनसाठी पैसे आणण्यास सांगितलं. ऑपरेशन साठी लागणारे १ लाख रुपये ते लोकलमध्येच विसरले.
कल्याण स्थानकावर उतरल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली. नितेंद्र यांनी तातडीने स्टेशन मास्तरला सांगितलं. कल्याण स्टेशन मास्तरांनी लगेचच अंबरनाथ आरपीएफ आणि अंबरनाथ स्टेशन मास्तरांना माहिती दिली.
लोकल अंबरनाथमध्ये आल्यानंतर आरपीएफच्या जवानांनी लोकलच्या डब्यातून ती रक्कम आपल्या ताब्यात घेऊन ती नितेंद्र यांना परत केली.