खानदेशाचा पारा वाढला, धुळ्याचं तापमान ४३ अंशांवर
खानदेशात सूर्यनारायण चांगलाच तापलाय. गेल्या तीन दिवसांपासून खानदेशात उच्च तापमानाची नोंद होतेय.
धुळे : खानदेशात सूर्यनारायण चांगलाच तापलाय. गेल्या तीन दिवसांपासून खानदेशात उच्च तापमानाची नोंद होतेय. त्यात धुळे जिल्ह्याचा पारा 43 अंश सेल्सियसवर गेलाय.
सूर्यनारायण आग ओकू लागल्याने सकाळी 10 पासूनच उन्हाचे चटके बसू लागलेत. अंगाची लाही लाही करणा-या उन्हामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण झालंय. दुपारच्या वेळी तर रस्ते ओस पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
घरातून बाहेर पडताना नागरिक डोक्याला रुमाल बांधून किंवा टोपी घालूनच बाहेर पडतायत. शीतपेयं आणि ज्यूस घेऊन ते घशाला पडलेली कोरड दूर करत असल्याचं चित्र जागोजागी पाहायला मिळतंय. पारा चढता असल्याने नागरिकांनी दुपारच्या वेळी घरातून बाहेर पडणं टाळावं असं आवाहन प्रशासनाने केलंय.