पुणे: पुण्यातल्या मंगळवार पेठेत झोपडपट्टीला लागलेली आग नियंत्रणात आली आहे. सिलेंडरच्या स्फोटामुळं ही लाग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या आगीत 30 ते 40 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आग लागली तेव्हा 8 ते 10 सिलेंडरचे स्फोट झाले. दाट लोकवस्ती आणि अरुंद रस्ते यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळे येत होते. त्यामुळे आगीची तीव्रता आणखी वाढली. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन, आग आटोक्यात आणली. 


अग्निशमन दालाच्या जवानांनी घटनास्थळावरून 8 सिलेंडर्स बाहेर काढले आहेत. तसंच परिसरातील नगरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी चार जण किरकोळ जखमी झालेत. मात्र आगीमुळे गरीबांच्या संसाराची राखरांगोळी झाली.