राज्यात गेल्या २४ तासात पावसाचे १४ बळी
गेल्या चार वर्षांपासून दुष्काळानं होरपळलेल्या महाराष्ट्रात यंदा मात्र पावसानं थैमान घातलंय. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळं जीवितहानी झालीय. गेल्या 24 तासांमध्ये पावसाचे 14 बळी गेले आहेत.
मुंबई : गेल्या चार वर्षांपासून दुष्काळानं होरपळलेल्या महाराष्ट्रात यंदा मात्र पावसानं थैमान घातलंय. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळं जीवितहानी झालीय. गेल्या 24 तासांमध्ये पावसाचे 14 बळी गेले आहेत.
नंदूरबारमध्ये सर्वाधिक चार जण ठार झाले आहेत. तर अहमदनगर जिल्ह्यात दोन, ठाणे जिल्ह्यात दोन, चंद्रपूरमध्ये चार, अकोला आणि साता-यात दोन जणांचा बळी गेलाय. तसंच दीडशे जनावरांचा मृत्यू झाला असून तब्पल 500 घरांचं नुकसान झालंय.
गेल्या 24 तासांत राज्यात सर्वात जास्तच कोल्हापूरमध्ये पाऊस झालाय. तर त्याखालोखाल गडचिरोली आणि अकोल्यात मुसळधार बरसलाय.
कोल्हापूर पंचगंगेला पूर
कोल्हापूर जिल्हयात मुसळधार पाऊस सुरुच आहे. पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली असुन तीची वाटचाल धोकापातळीकडं सुरु झाली आहे.
पंचगंगा नदीची पाणी पातळी 41 फुट 4 इंच इतकी असुन इशारा पातळी ही 39 फुट इतकी आहे. तर धोका पातळी 43 फुट इतकी आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्याचं पाणी पात्राबाहेर पडल्यामुळं अनेक मार्गावर पाणी आलाय. जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात तब्बल 1454 मीमी पावसांची नोंद झालीय. सर्वाधिक पाऊस हा गगणबावडा तालुक्यात 293 मीमी इतका पडलाय. जिल्ह्यातील सत्तर बंधारे पाण्याखाली गेले असुन कोल्हापूर – रत्नागिरी राज्यमार्ग बंद झालाय.
तर कोल्हापूर कोडोली मार्गावर पण पाणी आलाय. या सगळ्याच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झालं असुन प्रशासनानं नदी काठच्या गावांना सतर्क राहाण्याचे आदेश दिलेत.
बुलढाण्यातील पूर्णा नदीला पूर
बुलडाणा जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून सुरु असलेल्या सतंतधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या पूर्णा नदीला मोठा पुर आलाय. जिल्ह्यातील संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्याच्या संपर्क तुटला आहे.
....पूर्णा नदीच्या शेगाव संग्रामपूर रोडवर खिरोडा येथे असलेल्या पुलावरून 3 ते 4 फुट पाणी आलंय. संग्रामपुर तालुक्याचा संपर्क तुटलाय. तिकडे नांदुरा-जळगाव जामोद रस्त्यावरच्या येरळी पुलावरून 7 ते 8 फुटापर्यंत पानी आलंय.
त्यामुळे जळगाव जामोद तालुकाही संपर्क हीन झालाय. याभागात अजूनही मुसळधार पाऊस सुरु असूनही जनजीवन विस्कळीत झाले आहे...
वारणा धर ५३ टक्के भरले
सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. वारणा धरणात १८ टी एम सी पाणी साठा असून हे धरण ५३ हे टक्के भरल आहे. तर कोयना धरण ३९ टी एम सी पाणी साठा असून हे धरण ३७ हे टक्के भरल आहे.
सांगली जिल्ह्यातील चार तालुल्यात अतिवृष्टी झाली असून, शिराळा तालुक्यातील तीन पूल पाण्या खाली गेले आहेत. कृष्णा - वारणा नद्या ह्या पात्रा बाहेर पडल्या आहेत. औदुंबर येथील दत्त मंदिरात कृष्णेच पाणी शिरलं आहे.
सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 31 फुटावर गेली आहे. सांगलीतील आरवाडे आणि सूर्यवंशी प्लॉट मधील घरात पावसाच पाणी शिरलं असून, येथील नागरिक स्थलांतरी करण्यात आलंय.
गडचिरोली : वैनगंगात बोट बुडाली...
वडसा तालुक्यातल्या सावंगी येथील वैनगंगा नदीपात्रात बोट बुडाली. बोटीमध्ये असलेल्या १२ पैकी १० लोकांना वाचवण्यात रेस्क्यू टीमला यश आलंय.
उर्वरीत दोघांचा शोध अजूनही सुरूच आहे. प्रवासी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील लाडज येथील रहिवासी आहेत.
नांदेड जिल्ह्यातील अनेक गावातील संपर्क तुटला
नांदेड जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे.. या पावसामुळे नदी, नाल्यांना पुर आलाय... तर अनेक गावांचा संपर्कही तुटलाय...
भोकर तालुक्यात एक व्यक्ती पुरात वाहून गेलीये... नांदेड शहरातही अनेक सखल भागात पुराच्या पाण्याने थैमान घातलंय.. असं असताना महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा मात्र गायब आहे.
नांदेडमधील विष्णूपुरी धरण ९० टक्के भरले
नांदेडमधील विष्णुपुरी धरण 90 टक्के भरलंय. पाण्याची आवक सुरूच असल्याने धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आलेत. नांदेड जिल्ह्यात तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरण भरलंय.
विष्णुपुरी धरणाने गेल्या महिन्यात तळ गाठला होता. महिनाभरातच धरण भरले... याच धरणातुन नांदेड शहराला पाणी पुरवठा केला जातो. शिवाय सिंचनासाठी देखिल धरणातील पाण्याचा उपयोग होतो.