डोंबिवली : मुंबई तसेच उपनगरात जोरदार पाऊस सुरु आहे. येत्या २४ तासांत मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वेधशाळेनं व्यक्त केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईसोबत कल्याण आणि डोंबिवली शहरांनाही मुसळधार पावसाने झोडपलंय. डोंबिवलीच्या स्टेशन परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय.


स्टेशन परिसरातील अनेक इमारतीत तसेच घरांमध्ये पाणी घुसलंय. पावसाचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरही झालाय. मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे कोलमडलीये.