नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडली
जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 96% पावसाची नोंद झाली आहे. सर्व धरणे भरली असून अनेक ओव्हरफ्लो झाली आहेत.
नांदेड : जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 96% पावसाची नोंद झाली आहे. सर्व धरणे भरली असून अनेक ओव्हरफ्लो झाली आहेत.
सहा वर्षानंतर लिंबोटी प्रकल्प पूर्णपणे भरला आहे. लिंबोटीचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून त्यातुन पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मन्याड नदी दुथडी भरून वाहत आहे. विष्णुपूरी धरण 100 % भरले असून धरणाचे 18 पैकी आठ दरवाजे उघडण्यात आले आहेत.
या दरवाजातून तब्बल 1 लाख 17 हजार क्युसेक प्रतीसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.