हेमलकसा : बाबा आमटेंनी सुरु केलेला शिक्षणाचा प्रवाह त्यांच्या पुढच्या पीढिनंही अविरत सुरूच ठेवलाय... आज बारावीचा निकाल लागलाय... आणि या निकालात या आदिवासी विद्यार्थ्यांनी आमटेंच्या या कष्टाचं चीज केल्याचं सिद्ध झालंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेमलकसा इथल्या लोक बिरादरी ज्युनियर कॉलेजचे ९७.३७ टक्के विद्यार्थी बारावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेत. आत्राम पंकज महारू या आदिवासी विद्यार्थ्यानं तब्बल ५२१ गुण (८०.१५ टक्के) मिळवून शाळेत पहिला क्रमांक पटकावलाय. या शाळेतले २१ विद्यार्थी फर्स्ट क्लास मिळवून पास झालेत. 



'शिक्षण' हा असा एकच पर्याय आहे ज्याने जमातीतील लोकांना त्यांच्या परिस्थितीची जाणीव करून देता येईल आणि म्हणूनच परिस्थिती सुधरवण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करतील, असा बाबा आमटेंचा विश्वास होता... आणि हाच विश्वास आज या विद्यार्थ्यांनी सार्थ करून दाखवलाय.