मनमाड : मनमाड शहराला महिन्यात एकदा पाणीपुरवठा केल्या जात असल्याच्या प्रकाराची मुंबई हायकोर्टानं गंभीर दखल घेतलीय. राज्य शासन आणि मनमाड नगर परिषद प्रशासनाला खडसावत मनमाडच्या जनतेला १० दिवसांनी पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर पालिका प्रशासनानं १५ दिवसांनी पाणी देण्याचं प्रतिज्ञा पत्र सादर केलं असलं तरी तहानलेल्या मनमाडकरांना १५ दिवसांनी का होईना पाणी मिळेल का ? हाच खरा प्रश्न आहे. 


दरम्यान मनमाडला रेल्वेने पाणी पुरवठा करण्याबाबत  पुढील सुनावणी  ५ मे  रोजी  होणार आहे. न्यायालयाने  रेल्वे अधिकाऱ्यांना  मनमाड शहराला रेल्वेने पाणी पुरवठा करण्याबाबत आपले म्हणणे मानण्यास सांगितले आहे.