खेळण्यातलं पिस्तूल समजून देशी कट्टा घेऊन मुलगी शाळेत
हिंगोलीमध्ये इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडे देशी कट्टा आढळल्यामुळे खळबळ माजली. खेळण्यातली बंदूक म्हणून या मुलीने देशी कट्टा शाळेत नेला होता.
हिंगोली : हिंगोलीमध्ये इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडे देशी कट्टा आढळल्यामुळे खळबळ माजली. खेळण्यातली बंदूक म्हणून या मुलीने देशी कट्टा शाळेत नेला होता.
विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल मध्ये ही घटना घडली. या देशी कट्ट्यासोबत नऊ काडतुसही होती.हा देशी कट्टा तातडीने जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी मुलीच्या वडीलांवर अवैधरित्या शस्त्र वापरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सैय्यद मुस्ताक सय्यद आजमयांना हिंगोली पोलिसांकडून अटकही करण्यात आली.