कल्याण-दिवा रेल्वे फाटकाजवळ गेटमनला मारहाण
कल्याण-दिवा रेल्वे फाटकाजवळ गेटमनला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. 4 ते 5 तरुणांनी गेटमनला बेदम मारहाण केल्याची माहिती आहे. गेटमनला जबरदस्ती फाटक उघडण्याची या तरुणांनी मागणी केली होती. पण फाटक उघडण्यास गेटमन मिलिंद पाटील यांनी नकार दिल्याने त्यांना मारहाण करण्यात आली.
ठाणे : कल्याण-दिवा रेल्वे फाटकाजवळ गेटमनला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. 4 ते 5 तरुणांनी गेटमनला बेदम मारहाण केल्याची माहिती आहे. गेटमनला जबरदस्ती फाटक उघडण्याची या तरुणांनी मागणी केली होती. पण फाटक उघडण्यास गेटमन मिलिंद पाटील यांनी नकार दिल्याने त्यांना मारहाण करण्यात आली.
मिलिंद पाटील यांच्यावर कल्याण रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ठाणे जीआरपीमध्ये अज्ञात तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधावरी रात्री हा सगळा प्रकार घडला होता. पोलीस या तरुणांचा शोध घेत आहेत.