ठाणे : अत्यंत आकर्षक परताव्याचे स्वप्न दाखवून शेकडो लोकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्याला ठाणे पोलिसांनी जेरबंद केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संतोष भावसार नावाच्या या ठकसेनानं, गाडी भाड्यानं घ्यायच्या योजनेखाली, सुमारे १५० ते १७० लोकांना लुबाडल्याची माहिती समोर आलीय. नागरीकांकडून नव्या को-या गाडीच्या किमतीची अवघे १० ते  २० टक्के रक्कम संतोष भावसारनं घेतली. त्या बदल्यात त्यांना संतोषनं महिन्याला ४० ते ५० हजार रुपयांच्या परताव्याचं स्वप्न दाखवले होते.


झटपट श्रीमंत होण्याच्या इच्छेने झपाटलेल्यांनी त्याच्या भूलथापांना बळीपडून, अवघ्या २० दिवसांतच डार्क हॉर्स २ सोल्यूशन्स या कंपनीत कोट्यवधींची गुंतवणूक केली. मात्र भावसार कंपनीत येणे बंद झाल्यानंतर, या गुंतवणुकदारांचे डोळे उघडले. दरम्यान पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली. न्यायालयाने त्यालाल २१ जुलैपर्यंतची पोलीस कोठडी दिली आहे.