नागपूर : पत्नीचा सहवास मिळावा म्हणून नोकरी सोड अशी बळजबरी करणाऱ्या पतीविरोधात नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केवळ वैवाहिक सुखासाठी पती आपल्या पत्नीला नोकरी सोडण्याची बळजबरी करु शकत नसल्याच निर्णय नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयाने दिलाय. याचिका दाखल करणारी व्यक्ती ही नागपूरच्या सुखवस्तू कुटुंबातील आहे. त्याची पत्नी उत्तर प्रदेशात शिक्षिका म्हणून काम करते. 


दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्याने पतीला पत्नीचा सहवास मिळत नव्हता त्यामुळे तो सतत पत्नीला नोकरी सोड असे सांगत होता. याप्रकऱणी त्याने नागपूर कौटुंबिक न्यायालयात याचिकाही दाखल केली. 


यावर निर्णय देताना न्यायालयाने पती पत्नीला नोकरी सोडण्यासाठी सक्ती करु शकत नसल्याचे मत नोंदवले. तसेच दुसऱ्या राज्यात नोकरी करणे हे वैवाहिक हक्कांचे उल्लंघन नसून प्रत्येक स्त्रीला तिचे करिअर घडवण्याचा अधिकार आहे. तसेच याबाबतीत पतीने विरोध करण्याऐवजी तिला साथ द्यावी असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.