नागपूर : चारित्र्याच्या संशयावरून नागपूरमध्ये एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीचा लहान मुलांसमोरच खून केल्याची घटना नागपूरमध्ये घटली आहे. हा क्रुरकर्मा पती एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं पत्नीची हत्या केल्यावर दिवाळीचे फटाकेही वाजवले. शेख शब्बीर असं या व्यक्तीचं नाव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

27 वर्षांच्या शाहीन अंजूमचा 7 वर्षांपूर्वी शेख शब्बीरशी विवाह झाला. दोघांचही हे दुसरं लग्न होतं. दोघांनाही पहिली दोन मुलं होती. दारूच्या आहारी गेलेल्या शब्बीरला शाहीनच्या चारित्र्यावर संशय येत असे. त्यातून तो बेदम मारहाण करत होता.


शनिवारी संध्याकाळी शब्बीरने परत एकदा अमानूषपणे शाहीनला मारहाण केली आणि तिचा गळा आवळत खून केला. शाहीनच्या मृत्यूनंतर त्याने तिचा मृतदेह दोरखंडाला बांधत आत्महत्येचा बनावही रचला. शब्बीरने हे कृत्य आपल्या 4 मुलांच्या डोळ्यांसमोर केलं. एवढ्यावर हा क्रूरकर्मा थांबला नाही तर शाहीनने आत्महत्या केल्याने आपण तिच्या जाचातून सुटलो असं जाहीर करत त्याने घराबाहेर फटाकेही फोडले.


शब्बीर मारहाण करत असल्याची तक्रार शाहीनने आपल्या आईकडे याआधी अनेकदा केली होती. पण या घरगुती वादामुळे शाहीनच्या आईने त्याकडे दुर्लक्ष केलं. याप्रकरणी शेख शब्बीरला अटक झाली असून आठ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.