ठाणे : पाळणाघरात मुलांना ठेवणं हे धोक्याचं झालं असल्याचं खारघरच्या घटनेनं स्पष्ट झाल्यावर आता शहरातील प्रत्येक पाळणाघराने येत्या आठ दिवसांत महापालिकेच्या समाज विकास विभागाकडे नोंदणी करणं गरजेचं आहे. नोंदणी न करणारी सर्व पाळणाघरं बंद करण्याचा इशारा ठाणे महापालिका प्रशाससाने घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खारघरमधील पूर्वी प्ले स्कूलमध्ये मुलांना सांभाळणाऱ्या आयाने 10 महिन्यांच्या लहानगीला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला होता. यामुळे पालकवर्गात संताप आहे. आता ठाणे महापालिकेने यातून धडा घेत ठाण्यातल्या पाळणाघरांवर अंकूश आणण्याचे प्रयत्न सुरू केलेत.


येत्या आठ दिवसांत सर्व पाळणाघरांना नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी करताना स्टाफची माहिती, सोयीसुविधा, याची माहिती द्यावी लागणार आहे. माहिती न दिल्यास पाळणाघरं बंद करण्याची कारवाई करण्यात येईल. खारघरच्या घटनेनंतर आता पालक आणि पालिका दोघेही जागे झालेत. त्यामुळे कडक पावलं उचलली जात आहेत.