अनैतिक संबंधात अडसर, स्वतःच्या चिमुकलीला आईने दिले चटके
अनैतिक संबंधात अडसर ठरणा-या स्वतःच्या ९ वर्षीय चिमुकलीला तिच्याच आईने चटके दिल्याची घटना जळगावमध्ये घडली आहे. जळगावच्या रामेश्वर कॉलनी परिसरात ही घटना घडलीय.
जळगाव : अनैतिक संबंधात अडसर ठरणा-या स्वतःच्या ९ वर्षीय चिमुकलीला तिच्याच आईने चटके दिल्याची घटना जळगावमध्ये घडली आहे. जळगावच्या रामेश्वर कॉलनी परिसरात ही घटना घडलीय.
या सगळ्या प्रकारात या मातेला तिच्या प्रियकराचीही साथ मिळाली आहे. घटनेची माहिती शिवसेना महिला आघाडीला मिळताच त्यांनी या क्रुर मातेला चांगलाच चोप दिला. तसेच २३ वर्षीय प्रमोद पाटील या तिच्या प्रियकराच्या तोंडाला काळं फासून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं.
पीडित मुलीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या संतापजनक प्रकरामुळे परिसरात चीड व्यक्त करण्यात येत आहे.