पुणे : पन्नास दिवस झाले तरी ग्रामीण भागात बँकांची परिस्थिती 'जैसे थे'च आहे. हे पुणे जिल्ह्यातील इंदापूरचं चित्र आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोट बंदी होऊन आज पन्नास दिवस झाले, मात्र अजूनही जिल्हा सहकारी बॅंकात नोटांचा खडखडाट आहे.


ग्रामीण भागातील सर्व आर्थिक व्यवहार हे जिल्हा बॅंकेवर अवलंबून आहेत, परंतू रिझर्व बॅंक अद्याप पर्यंत या बॅंकाना चलन पुरवठा करायला तयार नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागाची आर्थिक घडी कोलमडून गेली आहे.