रत्नागिरीत शिवसेना स्वबळावर, पारदर्शकतेवरुन हल्लाबोल
जिल्हा परिषदेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी केली.
रत्नागिरी : जिल्हा परिषदेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी केली.
कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यात शिवसेना कोणाशी तडजोड करु शकणार नाही, अशी सुरुवातीपासून चर्चा होती. त्याचप्रमाणे शिवसेनेने भाजपला सोबत न घेता स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भाजपची जिल्ह्यात ताकद कमीच आहे. त्यामुळे युती होण्याची शक्यता कमी होती. आता त्यावर राऊत यांच्या घोषणेने शिक्कामोर्तब झाले आहे.
भाजला शिवसेनेचे खडेबोल
तसेच शिवसेना-भाजपमध्ये सध्या पारदर्शकतेवरून जे कोल्डवॉर सुरू आहे. त्याचाही शिवसेनेने चांगलाच समाचार घेतला. नोटबंदी केली तेव्हा कुठे होती तुमची पारदर्शकता, असा सवाल विनायक राऊत यांनी विचारला आहे. राऊत हे रत्नागिरीत बोलत होते.