नवी दिल्ली : भारतीयांसाठी एक धक्का देणारी बातमी. राष्ट्रीय रायफलच्या एका जवानाला पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले. हा धुळ्यातील जवान बेपत्ता असल्याचे समोर आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंदू चव्हाण असे जवानाचे नाव आहे. काल त्यांच्या कुटुंबियांना चंदू बेपत्ता असल्याचा फोन आला. चंदू 22 तारखेला धुळ्यात सुट्टीसाठी येणार होता. मात्र सुट्टी रद्द करण्यात आली असल्याचे समजते आहे.


चंदू चव्हाण सध्या पाकिस्तानच्या ताब्यात असून त्यानं अनावधानानं नियंत्रण रेषा पार केल्याचे स्पष्टीकरण लष्कराच्यावतीने देण्यात आले आहे.


दरम्यान, तो सर्जिकल स्ट्राइक ऑपरेशन मधील जवान नाही आर्मीने स्पष्ट केलेले आहे. राष्ट्रीय रायफलच्या एका जवानाला पाकिस्तानी सैन्याने पकडले. चंदू बाबूलाल चौहान असे या जवानाचं नाव आहे. पाकिस्तान लष्करानं भारतीय लष्कराला याबाबत माहिती दिली आहे. हा जवान सर्जिकल कारवाईत सहभागी नसल्याचं लष्करानं स्पष्ट करण्यात आले आहे. हा जवान चुकून सीमा रेषा पार करुन पाकिस्तानमध्ये गेल्याचं लष्कराकडून सांगण्यात येत आहे.