शिर्डी : साई समाधी शताब्दी वर्ष 2017 साली विजयादशमी ला साजरा होत आहे. यासाठी देश आणि विदेशातील साईमंदिरांशी समन्वय साधुन समाधी शताब्दी सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा यासाठी आज शिर्डीत देशभरातील 1100 तर विदेशातील 43 प्रतिनीधी या परिषदेत सामील झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सगळ्या सोहळ्याला शिर्डीच्या विश्वस्तानी बट्टा लावलाय. या कार्यक्रमाचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन झालं. अर्थमंत्र्यांचं भाषण संपल्यानंतर ते प्रसारमाध्यांमाशी बोलत असताना साईबाबा संस्थानचे विश्वस्त प्रताप भोसले यांनी मुनगंटीरांना थांबवत बाहेर जाऊन बोला अस सांगितल. अर्थमंत्र्यांची पत्रकार परिषद बंद पाडत शिर्डीच्या विश्वस्ताची मुजोरी समोर आली आहे.