जळगाव : महापालिकेचे उपायुक्त राजेंद्र फातले यांना पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप विभागीय अधिकारी पराग सोनवणे यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तक्रारदार हे जळगाव महापालिकेत सहायक आयुक्त असून ते एका प्रकरणात निलंबित असल्याने पॉजिटिव्ह रिपोर्ट तयार करण्यासाठी फातले यांनी तक्रारदार सहायक आयुक्तांकडे एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती. 


त्यातील एक लाख रुपये आगाऊ तर आयुक्तांची स्वाक्षरी झाल्यावर उर्वरित ५० हजार लाच देण्याचे ठरले होते, त्यानुसार लाचेचा पहिली ५० हजार रक्कम  स्वीकारताना फातले यांना त्यांच्या राहत्या घरून अटक करण्यात आली. फातले यांच्यावर जिल्हा पेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.