COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जळगाव : जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात तसेच अमळनेर तालुक्यात दुपारी गारांचा वर्षाव झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांचं नुकसान झालं आहे.


पारोळा तालुक्यातील कोळप्रिंप्री येथे गारा पडल्याचा व्हिडीओ


अमळनेर तालुक्यातील शिरुड कावपिप्री इंद्रापिंप्री, फापोरे, कन्हेरे येथे अचानक सोमवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह गारपीठ झाल्याने रब्बी पिकांचे मोठे अतोनात नुकसान झाले आहे. 


अगोदरच दुष्काळ, पुन्हा गारपीठ यात शेतकरी अडकला आहे.


शहर आणि तालुक्यात काही भागात वादळी वा-यासह हलका पाऊस झाला असून शिरुड शिवारात जोराच्या वाऱ्यासह गारपीठ झाली आहे. यामुळे रब्बी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर वादळी वा-यामुळे झाडे रस्त्यावर मोडून पडल्याने ठिकठिकाणी रस्त्यावरील वाहतुक ठप्प झाली होती सोमवारी दुपारनंतर तालुक्यात ढगाळ वातावरण होते.


दुपारनंतर वादळी वाऱ्यासह अमळनेर तालुक्यात काही ठिकाणी पाऊस झाला. तर शिरुड शिवारात सायंकाळी पाचच्या सुमारास आचानक वादळी वाऱ्यासह मोठया प्रमाणात गारा बरसल्या या गारपीठीमुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.


एकंदरीच तालुक्यात बेमोसमी पावसामुळे रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यात गव्हू, हरभरा, दादर मका फाळबागा आदीसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे पुन्हा एकदा या भागातील शेतकरी आडचणीत सापडला आहे. या शेतक-याला आनुदानाची आता गरज आहे.


आधीच दुष्काळाच्या छायेत सापडलेल्या शेतक-यांचे अवकाळी पावसाने कंबरडेच मोडले आहे. परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. निसर्गाच्या लहरीपणापुढे शेतकरी पुरता हतबल झाला आहे.


निसर्गाने एका क्षणात शेतक-यांचे आर्थिक स्वप्न उध्‍दवस्त केले. गत तीन वर्ष दुष्काळ तर या वर्षी अवकाळी हा नवीनच ऋतु तयार होऊन शेतकऱ्यांचे स्वप्न उध्‍दवस्त करू लागला आहे. 


रब्बी हंगामातील पिकांची चांगलीच वाढ झालेली असताना या अचानक आलेल्या पावसाने पिकांवर परिणाम झाला. 


ज्वारी, गहू हरभरा या पिकांना चांगलाच फटका बसला तर ढगाळ वातावरणामुळे हरभरा, गहू, पिकांवर देखील घाटी अळी प्रादूर्भाव होण्याची चिन्हे दिसत आहेत,