पुणे : शहरात राडा पाहायला मिळाला. दुसऱ्या दिवशी राजकीय राडा झाला. येथे आलेले राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना धक्काबुक्की करण्यात आली. यानंतर भाजयुमो आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, प्राचार्य रवींद्रसिंग परदेशी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी यावेळी आव्हाड यांनी केली. तर विद्यार्थ्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याचे पुरावे सादर करा, अशी मागणी पोलिसांनी करताच कॉलेज व्यवस्थापन बॅकफूटवर आले.


 


फर्ग्यूसन कॉलेजचे प्राचार्य परदेशी यांनी माघार घेत आमच्याकडून टायपिंग मिस्टेक झाल्याचे स्पष्टीकरण दिले. तसेच विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या असल्यास त्यांच्यावर कारवाई करा असे आमचे म्हणणे होते असेही परदेशी यांनी सांगितले. दरम्यान, वाढता वाद पाहता परदेशी यांनी माफी मागितली आहे.


शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी परदेशी यांना तातडीने मुंबईचे बोलावणे धाडले आहेत. ते मुंबईला रवाना झाले आहेत. आज दुपारी ४ वाजल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड फर्ग्युसन कॉलेजच्या आवारात आले. यावेळी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांविरोधात घोषणाबाजी सुरु केल्या. त्याचवेळी आव्हाडांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. भाजयुमो आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार केला. यावेळी आव्हाड यांच्या अंगरक्षकांनी पिस्तूल काढत दादागिरी केली.


मंगळवारी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये 'अभिविप'चा विद्यार्थी नेता आलोक सिंह दिल्लीतील 'जेएनयू'मध्ये ९ फेब्रुवारीला काय घडले होते याची माहिती वजा व्याख्यान देण्यासाठी आला होता. मात्र, त्याचवेळी आंबेडकरी चळवळीशी संबंधित विद्यार्थ्यांनी कन्हैया कुमारच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या होत्या.