सोलापूर : सोलापुरातील कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश शाम रुकमे यांना मारहाण करण्यात आलीय. आपल्या गाडीतून घराकडे जात असताना शहरातील पत्रकार भवन परिसरात चार जणांनी त्यांची गाडी अडवून रुकमे यांना मारहाण केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुमो गाडीतून आलेल्या 3 जणांनी आपल्याला शिवीगाळ करत लोखंडी सळई, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी तिथं असलेल्या पोलीस कर्मचारी आणि नागरिकांनी आपल्याला सोडविल्याचं न्यायाधीश रुकमे यांनी सांगितलं. दरम्यान, सदर बझार पोलिसांनी या प्रकरणी महादेव कुदरे, दीनदयाळ गुंड, नितीन अंबुरे, संतोष मसले या चार आरोपीना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय.