कळवा पुलाच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल, जड वाहनांना बंदी
कळवा उड्डाण पुलाच्या कामामुळे नवी मुंबईमधील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात कण्यात आलाय. तर जड वाहनांना बंदी घालण्यात आलेय, अशी माहिती वहातूक पोलीस उपायुक्त अरविंद साळवी यांनी दिली.
नवी मुंबई : कळवा उड्डाण पुलाच्या कामामुळे नवी मुंबईमधील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात कण्यात आलाय. तर जड वाहनांना बंदी घालण्यात आलेय, अशी माहिती वहातूक पोलीस उपायुक्त अरविंद साळवी यांनी दिली.
मुंबई आणि मुलुंडमधून एेरोली मार्गे नवी मुंबईत येणारी जड वाहनाना सकाळी ८ ते दुपारी ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ५ ते रात्री ९. ३० पर्यंत ठाणे बेलापूर मार्गावर येण्यास बंदी आहे.
तर जेएनपीटी आणि बेलापूर येथून एरोली मार्गाने मुंबई येथे जाणारी जड वहातूक सकाळी ८ ते दुपारी ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ५ ते रात्री ९. ३० पर्यंत प्रवेशबंदी असणार आहे.
तसोच दुपारी ११ ते सायंकाळी ५ आणि रात्री ९.३० ते सकाळी ८ पर्यंत जड वहातूक सुरू राहील. यावेळी मुंबईमधून एेरोली मार्गे आलेली वहातूक दिघा सर्कलमधून पटनी मार्गाने ठाणे - बेलापूर मार्गे असेल. वाहान चालकांनी या नियमांचे पालन करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केली आहे.