कल्याण : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते कल्याणच्या वायलेनगर इथे मुंबई विद्यापीठ उपकेंद्राजवळच्या फुटपाथवरील ओपन जिमचं उदघाटन होणार आहे. मात्र ही जिम फूटपाथवर थाटण्यात आल्याने उदघाटनाआधीच वादात सापडलंय. मनसेनं या जिमला विरोध केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयुक्त सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर कामं करत असल्याचा आरोप मनसेनं केलाय. फुटपाथवर जिम थाटल्यामुळे नागरिकांनी चालायचं कुठून असा सवाल उपस्थित करण्यात आलाय.


केडीएमसीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या महापौर स्वेच्छा निधी आणि महापालिकेच्या निधीमधून मनपाच्या विविध क्षेत्रात विविध ठिकाणी जिम बसवल्या आहेत. 21 लाख रूपये खर्चून कल्याण डोंबिवलीत 7 ठिकाणी जिम बसवण्यात आल्या आहेत.