कल्याण : ऐतिहासिक कल्याण शहराचं आयसिस कनेक्शन पुन्हा एकदा उघड झालंय. नवी मुंबईतल्या आर्शिद कुरेशीच्या अटकेनंतर त्याच्याशी संबंधित आणखी एकाला ATSनं कल्याणमधून ताब्यात घेतलंय.आयसिससाठी तरुणांचं ब्रेनवॉश करून त्यांना संघटनेकडे वळवण्याचं काम रिझवान करायचा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परभणी येथून आणखी एका आयसीसच्या दहशतवाद्याला महाराष्ट्र एटीएसने अटक केलीये. 24 शाहिद खान असं या दहशतवाद्याचं नाव असून शाहिद हा पेशानं इंजीनिअर आहे.


परभणीतही संशयित अटकेत
आज पहाटे महाराष्ट्र एटीएस ने ही कारवाई केलीये. गेल्या आठवड्यात परभणी येथून अटक केलेल्या आयसीसचा दहशतवादी नासीर चाऊस याचा शाहीद हा साथीदार आहे.