कल्याण : संस्थाचालकांच्या अन्यायामुळे कल्याणमध्ये एका शिक्षिकेवर थेट रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आलीय. पुण्यात संस्थाचालका विरुद्ध आवाज उठवणाऱ्या शिक्षकाला चपलेने मारण्याची घटना ताजी असतानाच कल्याणमध्ये अशाच अन्यायाची घटना पाहायला मिळती आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लता पाचपोर या कल्याणमधील गुरुनानक शाळेत सहाय्यक शिक्षिका म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांना कायम करण्यावरून त्यांचा संस्थाचालकाशी वाद सुरु आहेत,ळ शाळेच्या मनमानीविरोधात आणि अन्यायाबाबत त्यांनी शिक्षणाधिकारी, मंत्रालयापर्यंत तक्रारी केल्या आणि यायाच राग मनात धरुन संस्थाचालक आणि मुख्यध्यापकांनी लता यांना उध्दटपणे वर्तणूक देत मानसिक छळ केल्याचा आरोप लता पाचपोर यांनी केला आहे.


आजही पाचपोर यांना कार्यालयात बोलावून मुख्याध्यापिका भाग्यश्री पिसोळकर आणि संस्थाचालकांनी त्यांच्यावर ओरडण्यास सुरुवात केली आणि अंगावर धावून गेल्याचा आरोप पाचपोर यांनी केला. त्या मानसिक धक्याने पाचपोर तिथेच कोसळल्या. त्यांच्यावर  सध्या कल्याणच्या एका खासगी रुग्णालयात ICU मध्ये  उपचार सुरु आहेत. या प्रकरणी कल्याण च्या  महात्मा  पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शाळेतील इतर शिक्षकांनीही मानसिक छळाचा आरोप केला आहे.