कल्याण :  कल्याण विठ्ठलवाडी दरम्यान   सकाळी 6 वाजता रुळाला तडे गेल्याने रेल्वे रुळावरुन घसरली जवळपास 6 डब्बे रुळावरुन खाली उतरले. डाउन लोकल असल्याने प्रवाशी संख्या कमी होती त्यामुळे कोणतीही जिवीतहानी झाली नाही.


पाहा या घटनेची टाइम लाइन....


 १) सकाळी 6 वाजता रुळाला तडे गेल्याने रेल्वे रुळावरुन घसरली जवळपास 6 डब्बे रुळावरुन खाली उतरले. डाउन लोकल असल्याने प्रवाशी संख्या कमी होती त्यामुळे कोणतीही जिवीतहानी झाली नाही. 
२) सकाळी आठच्या दरम्यान डब्बे काढण्याच्या कामाला सुरूवात झाली
३) ८.३० वाजता कर्जत - अंबरनाथ दरम्यान पहिली शटल सेवा सुरू 
४) ९.१५ ला पहिली लोकल बदलापूर – सीएसटी सीएसटीच्या दिशेने काढण्यात आली 
५) १०.१५ वाजता दुसरी लोकल सोडण्यात आली. 
६) ११ वाजता मदत करणारी रेल्वेची गाडी पोहचली.
७) युद्धपातळीवर रेल्वे दुरूस्तीचे काम सुरू झाले
तीन टप्यात काम हातात घेण्यात आले. 
- ट्रॅकची दुरुस्ती करणे - रुळावरुन घसरलेले डब्बे ट्रकवर आणणे - ट्रेन रवाना करणे - ओव्हर हेड वायर आणि घसरलेल्या डब्याच्या धडकेने तुटलेला पोलही दुरुस्त करणे 
८) १.३० ला रुळावरुन घसरलेले डब्बे पुऩ्हा रुळावर पूर्ववत आणण्यात आले 
९) दुपारी दोन वाजता रुळावरुन घसरलेली गाडी कारशेडला रवाना झाली  
१०) रुळाच्या दुरुस्तीचे काम ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू 
११) प्रशासनाचे म्हणणे आहे ४ वाजेपर्यंत काम पूर्ण होईल मात्र प्रत्यक्षात रात्र होईल ही शक्यता नाकारता येत नाही. 
१२) चाकरमान्याचे हाल होणार रुळाच्या दुरुस्तीच्या कामा नंतर स्पेशल ट्रेन पहाणीसाठी सोडण्यात येणार आहे.