नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संसदीय कारकिर्दीमध्ये ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त ठिकठिकाणी पवारांचे सत्कार होत आहेत. नांदेडमध्ये झालेल्या अशाच एका सत्कारावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार केशवराव धोंडगे यांनी पवारांचा स्टेजवरच मुका घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुका घेतल्यानंतर मात्र धोंडगेंनी पवारांवर सडकून टीका केली. शरद पवार हे बिना चीपड्याचे नारद आहेत. पवारांची बारामती म्हणजे भानामती आहे. पवार कोणाच्या घरचा माणूस कसा फोडतील याची कुणकुण लागू देत नाहीत. नारदही पवारांची बरोबरी करू शकत नाहीत, अशा बोचऱ्या शब्दांमध्ये धोंडगेंनी पवारांवर तोंडसुख घेतलं.


दरम्यान धोंडगेंनी घेतलेल्या मुक्यावर पवारांनी मिश्किल शब्दांमध्ये भाष्य केलं. धोंडगेंनी जाहीर कार्यक्रमात मुका घेतला ते बरं झालं. मुका घेतलेले केशव धोंडगेच होते हे मला घरी सांगता येईल. नाहीतर पंचाईत झाली असती, असं पवार म्हणाले.  


पाहा नेमकं काय झालं या कार्यक्रमात