जळगाव : एकनाथ खडसे हे भाजपचे छगन भुजबळ आहेत, अशी घणाघाती टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. खडसेंकडे गैरमार्गानं पैसा येतोय, आणि तो सात संस्थांच्या माध्यमातून चलनामध्ये आणला जात आहे, असा आरोप दमानियांनी केला आहे. तसंच खडसेंच्या जावयाची लिमोझिन कार जप्त का केली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माझ्या मालकीची अनधिकृत जमिन शोधून द्या, त्याला बक्षिस देईन असं आवाहन खडसेंनी केलं होतं, त्यालाही दमानियांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुक्ताईनगरमधल्या जमिनीविषयी लवकरच माहिती देऊ, असं दमानिया म्हणाल्या आहेत.


तसंच जळगाव जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही दमानियांनी केला आहे. तापी नदीवरील पूल, निम्न तापी बंधाऱ्याचं काम, पद्मालय सिंचन योजना आणि कुऱ्हा वडोदा सिंचन योजना याबाबतची माहिती तापी पाटबंधारे विभागाकडे मागण्यात आली आहे. ही कागदपत्र मिळाल्यावर लवकरच माहिती देईन, असं वक्तव्य दमानियांनी केलं आहे.