अलिबाग : मुंबईतल्या व्यावसायिकाचं अपहरण करून त्याच्याकडची ४० लाखांची रोकड लुटणा-या तिघा पोलीस कर्मचा-यांना रायगड पोलिसांनी अटक केलीय. त्यांना १३ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रवी अंबू राठोड, प्रशांत अशोक कांबळे आणि किशोर धनाजी खाडे अशी त्यांची नावं आहेत. हे सर्व अलिबाग पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. तर इतर ४ आरोपींचा शोध सुरु आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे. 


मुंबईतल्या घाटकोपरमधले व्यापारी विमल पटेल यांना कमी भावात जमीन देतो असं सांगून, माहिला आरोपीनं अलिबागला बोलावून घेतलं. तिथून विमल पटेल यांना जमीन दाखावण्यासाठी अलिबागपासून जवळ असलेल्या गोंधळपाडा इथे नेण्यात आलं आणि तिथे आधीच हजर असलेल्या पोलिसांनी पटेल यांना जीवे मारण्याची धमकी देत, त्यांच्याकडचे ४० लाख रुपये लुटले होते. २६ डिसेंबर रोजी ही घटना घडली होती.