दुष्काळग्रस्त लातूरकरांवर आणखी एक संकट
गेल्या ३ वर्षांपासून भयानक दुष्काळाचा सामना करणाऱ्या लातूरकरांना आता एका नव्या संकटाने घेरलं आहे. बोरींगचं आणि दुषित पाणी प्यावं लागत असल्याने किडणीमध्ये स्टोन होण्याचं प्रमाण वाढलंय.
लातूर : गेल्या ३ वर्षांपासून भयानक दुष्काळाचा सामना करणाऱ्या लातूरकरांना आता एका नव्या संकटाने घेरलं आहे. बोरींगचं आणि दुषित पाणी प्यावं लागत असल्याने किडणीमध्ये स्टोन होण्याचं प्रमाण वाढलंय.
पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना भटकावं लागतंय. पिण्यासाठी पाणीच नसल्याने लोकांना टँकरद्वारे मिळणारं पाणी प्यावं लागतंय पण हे पाणी शुद्ध नसल्याने आणि बोरिंगच्या पाण्यात मीठ, कॅल्शियम आणि ओकलेट्स अधिक प्रमाणात असल्याने लातूरकरांच्या किडणीमध्ये स्टोनचं संकट वाढलंय.
लातूरकर उन्हाचा देखील सामना करतायंत त्यामुळे त्यांच्या शरीरात डिहायड्रेशनचं प्रमाण वाढतंय त्यामुळे इतर आरोग्यविषयक समस्या देखील वाढतायंत. पाणीसमस्या सोडवण्यासाठी लातूरमध्ये रेल्वेने पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिली ट्रेन ही मीरज येथे पोहचली असून लवकरच हे पाणी लातूरला पोहोचेल.