पालघर : पालघरमध्ये सुरू असलेलं किसान सभेचं आंदोलन १६ तासानंतर मागे घेण्यात आलंय. चार मागण्या सरकारनं मान्य केल्यानं आंदोलन मागे घेऊन आदिवासींनी आपला घेराव संपवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अंतर्गत पडकईच्या भ्रष्टचाराची चौकशी, आंबेगाव-जुन्नरच्या शेतक-यांना तातडीनं पडकईचे पैसे देणे, विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाच्या प्रश्नावर तातडीनं स्वतंत्र बैठक घेणे.


सात ऑक्टोबरला मंत्रालयात अन्न सगळ्या मागण्यांवरही सविस्तर बैठक घेण्यात यावी, या मागण्या सरकारनं मान्य केल्यात.


आदिवासी विकास मंत्र्यांच्या घराला जवळपास 40हजार आदिवासींनी घेराव घातला होता.