कोल्हापूर : या बातमीवर तुमचा विश्वास बसणार नाही. आज संध्याकाळी कोल्हापूरमध्ये एका बसनं अनेक वाहनांना आणि पादचाऱ्यांना धडक दिली.त्यात दोघांचा बळी गेलाय. धक्कादायक बाब अशी की २०१२ साली पुण्यात संतोष माने या माथेफिरू चालकानं अनेकांना चिरडलेल्या बसनंच आज कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा पुण्याची पुनरावृत्ती केल्याचं दिसतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एम.एच.१४  बी.टी.१५३२ क्रमांकाची ही एसटी महामंडळाची बस आहे. आजपासून सुमारे साडेपाच वर्षांपूर्वी याच बसनं पुण्यामध्ये अनेकांचे बळी घेतले होते. एकाच बसनं अवघ्या काही तासांच्या अंतरावर असलेल्या शहरांमध्ये एकाच पद्धतीनं माणसांचा बळी घेण्याच्या या विचित्र योगायोगाबद्दल आश्चर्य व्यक्त होतंय.


एस.टी.ची अनेक वाहनांना धडक. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर किमान १६ जण जखमी झालेत. दरम्यान, २५ जानेवारी २०१२ रोजी पुण्यात बेदरकारपणे एसटी चालवली होती. त्यात नऊ जण ठार झाले तर ३५ जण गंभीर जखमी झाले होते. या दोन्ही अपघातातील गाडीचा नंबर सारखा असल्याचे पुढे आलेय. कोल्हापुरातील एसटी अपघातातील आणि पुण्यामध्ये संतोष मानेनं बेदरकारपणे चालवलेली बस हीच असल्याचं नंबरप्लेटवरून उघड झालेय. दोन्ही अपघातातील एसटीचा क्रमांक एमएच-१४ बीटी-१५३२ हा एकच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याबाबत चर्चेला ऊत आलाय.



स्वारगेट स्थानकातून एसटी आपल्या ताब्यात घेऊन बेदरकारपणे चालवून ९ जणांचा चिरडले होते. संतोष हा मूळचा राहणारा हा कैठाले, जि. सोलापूर येथील आहे. याची संतोष याने २५ जानेवारी २०१२ रोजी पुण्यात बेदरकारपणे एसटी चालवली होती. त्यात नऊ जण ठार झाले तर ३५ जण गंभीर जखमी झाले होते. संतोषवर खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, चोरी आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे या गुन्ह्यांत त्याला आरोपी ठरविण्यात आले आहे.


दरम्यान, संभाजीनगर डेपोच्या एसटीची शहरात भर गर्दीत थरकाप उडवणारी घटना घडली. संध्याकाळी एका एसटी बसनं अनेक जणांना उडवलं. उमा टॉकीज परिसरातली ही घटना आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा बळी गेला, तर किमान १६ जण जखमी झाले.



एसटी बसचालक रमेश सहदेव कांबळे यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ही घटना घडल्याचं सांगण्यात येतंय. मात्र त्याला अजूनपर्यंत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. संध्याकाळी साडे पाच वाजता ही एसटी बस रंकाळ्यावरुन हुपरीला निघाली होती. उमा टॉकीज इथे आल्यानंतर चालकाचा ताबा सुटला. आणि कोंडावळ ते उमा टॉकीजपर्यंत या बसनं अनेक गाड्यांना उडवले. दरम्यान, या घटनेमुळे काही वर्षांपूर्वी पुण्यात अशाच प्रकारे घडलेल्या अपघाताची आठवण ताजी झाली.