मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर कोकण आणि गोव्यासाठी जादा विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. या गाड्या खास सुट्टीसाठी आहेत.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उन्हाळी सुट्टीत कोकण आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वेतर्फे या जादा गाड्या चालविण्यात येणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीडी) ते करमाळी, दादर ते सावंतवाडी आणि दादर ते झाराप दरम्यान गाड्या धावतील.


दादर ते सावंतवाडी 


दादर ते सावंतवाडी विशेष (गाडी क्र.०१०९५) : ही १७ एप्रिल ते ७ जून दरम्यान दर रविवार, मंगळवार, शुक्रवारी स. ७.५० वाजता सुटून रा. ८.३० वाजता सावंतवाडीला पोहोचेल. 


परतीच्या प्रवासासाठी गाडी क्र. ०१०९६ सावंतवाडी ते दादर विशेष गाडी १८ एप्रिल ते ८ जून दरम्यान दर सोमवारी, बुधवारी, शनिवारी पहाटे ४.५० वाजता सुटणार असून दादरला दु. ३.५० वाजता पोहोचेल. 


दादर ते झाराप


दादर ते झाराप विशेष (गाडी क्र. ०१०३३) : १८ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान दर रविवारी, मंगळवारी, शुक्रवारी स. ७.५० वाजता सुटून झारापला सायं. ७.५५ मिनिटांनी पोहोचेल. 


परतीच्या प्रवासासाठी झाराप ते दादर गाडी १९ मार्च ते १६ एप्रिल दरम्यान दर सोमवारी, बुधवारी, शनिवारी पहाटे ५ वाजता सुटून दादरला दु ३.५० मिनिटांनी पोहोचेल.


या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप येथे थांबा आहे.


एलटीटी ते करमाळी 


एलटीटी ते करमाळी एसी एक्स्प्रेस (गाडी क्र. ०१००५) : १ एप्रिल ते ३ जून दरम्यान दर गुरुवारी मध्यरात्रीनंतर १ वाजून १० मिनिटांनी सुटणार असून, शुक्रवारी स. ११.३० वाजता करमाळीस पोहोचेल. 


परतीच्या प्रवासासाठी गाडी क्र. ०१००६ करमाळी ते एलटीटी एसी विशेष गाडी ट्रेन दर शुक्रवारी दु. १.१० वा. सुटणार असून, सीएसटी येथे मध्यरात्री १२.२० वाजता पोहोचेल.


या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावतंवाडी, थिविम येथे थांबा देण्यात येणार असून ही गाडी १४ डब्यांची आहे.