रत्नागिरी : कोकणातल्या गणेशोत्सवाची सुरुवात भाद्रपद प्रतिपदेपासून होते. कोकणातल्या पहिल्या देवरुखमधील मानाच्या गणपतीचं आगमन झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संगमेश्वर तालुक्यातील देवरुखमधील चौसुपी वाड्यातील जोशी यांचा हा मानाचा गणपती. 350 वर्षांपासून सनई चौघड्यांच्या पारंपारिक वाद्याच्या साथीने हा गणपती आणला जातो. घोड्यावर आरुढ झालेली दिमाखदार मूर्ती डोक्यावरुन घेवून मिरवणुक निघते. अत्यंत पारंपारिक पद्धतीने या गणरायाचं आगमन जोश्यांच्या चौसुपी वाड्यात करण्यात येते.


मिरवणुकीत या मूर्तीची अनेक ठिकाणी मानाने पूजा केली जाते. उजव्या सोंडेचा असा हा गणपती. प्रचंड कडक आणि सोवळ्यातला गणपती मानला जातो. या गणपतीच आगमन झाल्या तर कोकणातील गणेशोत्सवाला सुरुवात होते.