अहमदनगर : कोपर्डी बलात्कार प्रकरणी आरोपींचं वकिलपत्र न घेण्याचा निर्णय अहमदनगर बार असोसिएशनने घेतला आहे. आरोपींनी कोर्टासमोर वकील देण्याची मागणी केली. यानंतर आरोपींचं वकिलपत्र न घेण्याचा निर्णय वकिलांच्या अहमदनगर बार असोसिएशनने घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदनगरमधील कोपर्डी गावात एका मुलीवर बलात्कार करून तिची, निर्घुण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपींना फाशी व्हावी म्हणून मराठा समाजाने प्रत्येक जिल्ह्यात मूकमोर्चे काढले आहेत. 


या प्रकरणात सरकारकडून वकिल म्हणून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम काम पाहणार आहेत. कोपर्डी बलात्कार प्रकरणाच्या खटल्याला आजपासून सुरूवात झाली, यावेळी उज्ज्वल निकमही उपस्थित होते.