सातारा : आणखी एक चांगली बातमी कोयना धरणाची क्षमता १०५ टीएमसी आहे आणि सद्यस्थितीत धरणात ५० टीएमसी पाणी आहे. धरण निम्म भरल्यामुळे वीज निर्मिती आणि १८ जलसिंचन योजना पूर्ववत सुरू झाल्यात.


एकूण साठ्यापैकी ६७.०५ टीएमसी पाण्यावर पश्चिमेकडचे ३ जलविद्युत प्रकल्पात वीज निर्मिती होते. पूर्वेकडे सिंचनासाठी सोडण्यात येणा-या पाण्यावर धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करण्यात येते. जर आणखी दमदार पाऊस झाला तरच धरण शंभर ट्कके भरण्याची शक्यता आहे.