माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा : भंडारा जिल्ह्यातल्या गावागावांमध्ये सध्या अचानक पोलीस येऊन धडकतात..... मग ग्रामस्थांची थोडी घाबरगुंडी उडते.... पण हे पोलीस ग्रामस्थांच्या मदतीला पोहोचलेले असतात.... भंडा-यातल्या पोलीस अधीक्षक वनिता साहू यांनी एक भन्नाट आयडिया काढलीय..... पाहुया काय आहे त्यांची ही आयडिया..... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भंडारा जिल्ह्यातल्या गावागावांमध्ये सध्या असा पोलिसांचा फौजफाटा फिरतो....  कुणाचीही धरपकड करण्यासाठी नव्हे तर ग्रामस्थांच्या मदतीसाठी..... पोलीस स्टेशन तुमच्या दारी अशी ही नवी कल्पना..... आणि ही आयडियाची कल्पना आहे भंडा-याच्या पोलीस अधीक्षक वनिता साहू यांनी. ब-याच वेळा गावातले छोटे-मोठे तंटे पोलीस स्टेशनपर्यंत येत नाहीत. मग गावात धगधगणारी ही छोटी भांडणं एकदम मोठी होतात आणि त्यातूनच खूनासारखे प्रमाण वाढतात... हे सगळं टाळण्यासाठी पोलीस स्टेशन तुमच्या दारी हा उपक्रम सुरू करण्यात आलाय.  


दर शनिवारी पोलीस एका गावात जाऊन असं पोलीस स्टेशन तयार करतात. भंडा-यात पोलिसांची संख्या गरजेपेक्षा कमी आहे....या उपक्रमामुळे एका गावचा प्रश्न एका दिवसात निकाली लागतो. देशातला हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे. 


पोलीस स्टेशन तुमच्या दारी या उपक्रमाअंतर्गत भंडारा पोलिसांनी आतापर्यंत 200 तंटे हाताळलेत, त्यापैकी दीडशे खटले निकाली निघालेत.  


वनिता साहू यांच्या या कल्पनेचं देशभरात कौतुक होतंय. भंडारा पोलिसांकडून प्रेरणा घेत आता मध्य प्रदेश, वडोदरा आणि चंदीगढ पोलिसांनीही अशाच प्रकारचा उपक्रम सुरू केलाय.  त्यामुळे असे "पोलीस आपल्या दारी आले तर घाबरून  जाऊ नका ,तर त्यांचं स्वागत करा आणि गावातले तंटेही गावातच सोडवा.