वजन कमी करायला गेली आणि जीव गेला!
![वजन कमी करायला गेली आणि जीव गेला! वजन कमी करायला गेली आणि जीव गेला!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2016/03/17/175561-jievve.jpg?itok=neSruoPA)
वजन कमी करण्यासाठी केलेली शस्त्रक्रिया पुण्यातल्या एका महिलेच्या जीवावर बेतलीय.
पुणे : वजन कमी करण्यासाठी केलेली शस्त्रक्रिया पुण्यातल्या एका महिलेच्या जीवावर बेतलीय.
ज्योती दुबे असं तिचं नाव आहे. तिच्यावरती पुण्यातल्या कमांड हॉस्पिटलमध्ये ८ मार्चला 'बॅरिअॅट्रिक ऑपरेशन' करण्यात आलं. पण, त्यानंतर काही कॉम्प्लिकेशन्स झाली आणि १४ मार्चला तिचा मृत्यू झाला.
याप्रकरणी वानवडी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोस्ट मार्टेम रिपोर्ट आणि वैद्यकीय समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
रिपोर्ट्स आणि वैद्यकीय समितीच्या अहवालात हलगर्जीपणा झाला असल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.