सातारा : रिओ ऑलिम्पिक जागवणारी धावपटू ललिता बाबर लग्नाच्या बेडीत अडकली आहे. ललिता बाबर आणि डॉक्टर संदीप भोसले यांच्या विवाह सोहळ्याला, राज्यासह देशभरातून मान्यवर मंडळी व-हाडी म्हणून उपस्थित होती. 


साता-यातल्या यशोदा महाविद्यालयाच्या प्रांगणात हा विवाह सोहळा संपन्न झाला. नेहमीच ट्रॅक सूटमध्ये दिसणारी ललिता बाबर नववधूच्या वेशभूषेत सा-यांनाच भावून गेली. तर विवाह सोहळ्यात मंचावरच्या सजावटीतलं ऑलिम्पिकचं बोधचिन्ह सर्वांचंच लक्ष वेधून घेत होतं.